भोसरी : क्राईम पेट्रोलमध्ये पोलिसाची भूमिका करणार्या अभिनेत्रीला बलात्काराचा खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. पूजा जाधव असे या अभिनेत्रीचे नाव आहे. पूजा स्वतःवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्थानकात आली असता पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.
पूजा जाधवने काही दिवसांपूर्वी एका धनदांडग्याला आपल्या जाळ्यात ओढले, त्याच्याशी लगट केली आणि त्यानंतर बलात्काराच्या आरोपाची धमकी देऊन पैसे उकळायला सुरुवात केली. संबंधित व्यक्तीने पोलिस ठाणे गाठले आणि पूजाचे बिंग फुटले. पूजा जाधवला यासाठी माया सावंत, रवींद्र सिरसाम आणि अन्य दोन महिलांनीही साथ दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ते दोघे सामाजिक कार्यकर्ते असल्याचं भासवायचे आणि धमक्या द्यायचे. पूजाने या आधीही अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. बडे ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल मालक आणि इंजिनियर्स अशी पूजाची हिटलिस्ट होती. त्यामुळे पोलिस पूजाचा शोध घेत होते.