बलात्काराच्या घटनेवर पंतप्रधानांचे मौन का?-राहुल गांधी

0

हैद्राबाद-देशातील विविध भागातून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांमुळे समाजात भीती निर्माण झाली आहे. देशात पुन्हा एकदा मुलींवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन का? असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र अमोदी यांना लक्ष केले आहे. ट्विट करत राहुल गांधी यांना मोदींना प्रश्न विचारले आहे.

राहुल गांधी हे आज मंगळवारपासून आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. कुरनूल येथे त्यांनी विद्यार्थी आणि पक्ष कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. देशातील महिलांना असुरक्षित आणि दहशतीखाली ठेवणाऱ्या सरकारची लाज वाटते. इथे बलात्कारी खुलेपणाने फिरत आहेत, असे ते म्हणाले.

रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी काँग्रेस सातत्याने हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर निशाणा साधत आहे. याप्रकरणी अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले आहे.