पिंपरी-चिंचवडमधील बहुसंख्य बांधवांची उपस्थिती
पिंपरी : कठुवा व उन्नावमध्ये घडलेल्या बलात्काराच्या दुर्दैवी घटनांच्या निषेधार्थ समस्त ख्रिस्ती समाजाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे कँडल मार्चद्वारे निषेध नोंदविण्यात आला. या सभेसाठी डॉ. बिशप थॉमस डाबरे यांचे प्रतिनीधी रॉय डी. माँन्टे व बिशप शरद गायकवाड यांचे प्रतिनिधी सुनील चोपडे, प्रदिप चांदेकर, सॅम्युएल साखरपेकर, मायकल राज नाडार, एम.बी.मनोज, अनिश विजागत, जोसेफ हिवाळे, नितीन काळे व मोझेस कलकोटी यांनी आपले मनोगत व्यक्त करून या दुर्दैवी घटनेचा निषेध केला.
दयानंद साळवी, आर.पी.इंगळे, जितेंद्र गायकवाड, येसुदास सायना, प्रदीप कदम, साँलोमन राज भंडारी, अहमद पिरजादे, अमोल असंगीकर, अनिता नायडू, सामाजिक कार्यकर्ते, भाउसाहेब मुगटमल, नितीन गायकवाड, विल्यम चंदनशिव, राजू गडकरी, नितीन गोर्डे, कुशल सोज्वळ, संजय उरुणकर, किरण जाधव, आकाश मोरे, अमृत नायडु, सुरेश ससाणे, सचिन गवारे, मॅन्युएल डिसुझा, सुरेश निर्मल, सँड्रा डिसुझा, अनुपमा कलकोटी, सियोना, वनिता पिल्ले, राजश्री शिरवळकर, बेटीना दास, सुषमा बिडगे, सीमा पाटील, पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील पाळकवर्ग, रेव्हरंड, सेल ग्रुप लिडर, सामाजिक पुढारी, जेष्ठ नागरीक, ब्रदर, सिस्टर, विविध ख्रिस्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बहुसंख्य ख्रिस्ती लोक समुदाय उपस्थित होता.
निषेध सभेचे सुत्रसंचालन बन्यामीन काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती व आभार प्रदर्शन राजन नायर यांनी केले. उपस्थित जनसमुदायाला अल्पोपहार व थंडपेयाची व्यवस्था नितीन काळे यांनी केली होती.