जळगाव। युवतीवर केलेल्या अत्याचाराची व्हिीडीओ क्लिप काढुन नंतर क्लिपचा धाक दाखवुन युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. दरम्यान, त्या नराधमास बुधवारी दुपारी जिल्हा पेठ पोलिसांनी कोर्ट परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, संशयित न्यायालयात अटकपूर्वासाठी अर्ज करण्याअगोदरच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
10 ते 17 मेें दरम्यान केले अत्याचार
पिडीत युवती मुळ देवपुर धुळे येथील असून 03 एप्रिल 17 च्या रात्री ते 10 मे 17 पावेतो आरोपी भावेश याने शिर्डी येथे साई संस्थानसमोरील लॉजवर तसेच जळगाव येथील पिडीतेच्या रूमवर पिडीतेच्या इच्छेविरूध्द अत्याचार केला. युवतीने नकार दिल्यावर संशयीताने व्हीडीओ शुुटींगची क्पिल समोर आणून बदनाम करेल, असा धाक दाखवित वारंवार बलात्कार केला. पिडीत युवतीस अत्याचारानंतर तीन महिन्याचा गर्भ राहिला. याप्रकरणी फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिस भावेशचा शोध घेत होते. दरम्यान, बुधवारी डिबी कर्मचारी नाना तायडे व शेखर पाटील यांना संशयित हा न्यायालयात अटकपूर्वासाठी जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर संदिप आराक, नाना तायडे, शेखर पाटील, भास्कर पाटील, भटू नेरकर यांनी कोर्ट परिसरात सापळा रचत भावेशला अटक केली आहे. तर त्याची पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात आली.