Major achievement of MIDC police : Rape and fraud accused arrested from Pune जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बलात्कारासह फसवणुकीच्या गुन्ह्यातील पसार आरोपींना पुणे शहरातून बेड्या ठोकल्या आहेत. गणेश निवृत्ती सपकाळे (३५, रा.भादली, ता.जळगाव, ह.मु. पुणे), संतोष गुलाब खडे (४५, रा.हडपसर, पुणे), चंद्राकांत सुनील जाधव (४०, रा.हडपसर, पुणे) अशी अटकेतील आरोपींचे नावे आहेत.
पुणे शहरातून आवळल्या मुसक्या
एमआयडीसी पोलिसांत तिघा आरोपींविरुद्ध बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. पोलिस अधीक्षक डॉ.एम राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसी निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक अंनिस शेख, एएसआय आनंदसिंग पाटील, नाईक विकास सातदिवे, छगन तायडे यांनी पुण्यातील हडपसर भागातून आरोपींच्या मुसक्या बांधल्या.
अत्याचारानंतर आरोपी पसार
गत महिन्यात एमआयडीसी पोलिसात महिलेवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आल्याने गणेश निवृत्ती सपकाळे (३५, रा.भादली, ह.मु.पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल होता मात्र गुन्हा दाखल होता संशयीत पसार झाल्याने त्याचा शोध सुरू होता. १९ रोजी पुण्यातील शिरुर गावातून ताब्यात घेण्यात आले.
१२ लाखांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी जाळ्यात
६ ऑगस्ट २०२२ रोजी तक्रारदार अब्दुल जब्बार कादर पटेल (मेहरून, जळगाव) यांची संतोष गुलाब खडे (४५, रा.हडपसर, पुणे) व चंद्रकांत सुनील जाधव (४०, रा.हडपरसर, पुणे) यांनी फिर्यादी सोबत भंगारच्या व्यवहारात भागीदारी करण्याचे आश्वासन देत ११ लाख ९० हजारांची रोकड घेत पळ काढला होता. संशयीत पुणे शहरातील स्टेशन रोड परीसरातुन क्राईम ब्राँच पुणे एकच्या पथकाच्या मदतीने अटक करण्यात आली.