बलात्कारी नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी

0

धुळे। नाशिक रोडवरील ओढा येथील चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्या प्रकरणी नराधमास फासावर देण्याची मागणी गवळी समाजाच्या वतीने करण्यात आली. जिल्हा गवळी समाजाच्या पदाधिकार्‍यांनी दि. 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन करीत प्रशासनाला निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, नाशिकरोड परिसरातील ओढा येथे एका चार वर्षीय बालिकेवर त्याच परिसरात रहाणाीर्‍या सुभाष झंवर नामक व्यापार्याने बलात्कार केला.

आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून त्याने या मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलविले व तिच्यावर अत्याचार केला. ही घटना काळीमा फासणारी असून या नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना जिल्हा गवळी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गवळी, भगवान पंगुडवाले, भीमराव गवळी, दीपक औसीकर, हिरामण गवळी, पारोजी गवळी, चिंतामण गवळी, प्रकाश एमगवळी, भुराजी दहिहंडे, लक्ष्मण गवळी, अशोक गवळी, विठ्ठल घुगरी, महादू उदीकर आदींसह गवळी समाजबांधव उपस्थित होते.