नवी दिल्ली – कोणत्याही प्रकरणात पीडित व्यक्तीने आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत तडजोड केली आणि आपला जबाब फिरवला तर पीडित व्यक्तीविरोधातही खटला चालवला जाऊ शकतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. जर बलात्कार प्रकरणात आरोपीविरोधात ठोस पुरावे आहेत आणि तरीही बलात्कार पीडित आपला जबाब बदलून आरोपीच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्यास तिच्याविरोधातही खटला नोंदवला जाऊ शकतो असेही सुप्रीम कोर्टा सांगितले आहे.
न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींना पीडितेच्या वैद्यकीय अहवालाशिवाय अन्य कोणत्याही आधारे क्लीन चिट दिली गेली, तरीही पीडितेविरोधात खटला चालवला जाणार. एका खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टानं हा निर्णय दिला आहे. एका बलात्कार प्रकरणात कोर्टानं दोषीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचं सांगत पीडितेनं जबाब बदला. या खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टानं संबंधित निर्णय दिला आहे.