बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा मुकमोर्चा

0

मु.जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

जळगाव । कठुआ, अन्नाव सुरत आणि सासाराम येथील बलात्कारांच्या घटनेच्या निषेधार्थ मु.जे. महाविद्यालयातील ‘संविधानवादी विद्यार्थी आघाडीचे’ विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आरोपींवर अद्यापपर्यंत शासनाने कारवाईची कुठलीही ठोस भुमिका घेतली नसल्याने सर्व घटनांच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांनी दिले मागणीचे निवेदन
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कठुआ, उन्नाव, सुरत आण सासाराम येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींवर अजूनही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. सरकारने ज्या गांभीर्याने या घटनेची दखल घ्यायला हवी होती, ती घेतली गेलेली नाही. बलात्कारांना पाठीमागे घालण्यासाठी ज्या शक्ति कारणीभूत आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी यासाठी मु.जे. महाविद्यालयातील ‘संविधानवादी विद्यार्थी आघाडीचे’ विद्यार्थ्यांनी निषेध म्हणून मुक मोर्चा काढण्यात आला. हा मुकमोर्चा मु.जे. महाविद्यालय, बहिणाबाई उद्यान, भास्कर मार्केट, चिमुकले राममंदिर, गांधी उद्यान, स्वतंत्र चौक, जिल्हाधिकारी कार्यालय अश्या मार्गाने निघाला. यावेळी तर काही विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. त्यानंतर समूहातील काही जणांनी थेट जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात जावून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना मागणीचे निवेदन दिले. निवेदन देतांना वैशाली झाल्टे, विकास मोरे, तुषार सुर्यवंशी, सागर नाईक, तुषार तोडकर, पियुष तोडकर, पंकज पवार, रोहित तायडे, आकाश चौधरी, प्रसाद तायडे, दिपाली पाटील, किर्ती फेगडे, कल्पेश पाटील, प्रतिभा शिरसाठ, स्नेहल शिरसाठ, विपूल पाटील यांच्यासह आदी विद्यार्थी उपस्थित होते.