बळसाणेत पर्युषण पर्वाची उत्साहात सांगता

0

शिरपूर। साक्री तालुक्यातील बळसाणे तीर्थावर पर्युषण पर्वाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली याप्रसंगी स्थानिक जैनांनी क्षमायाचना केली. गावातील विमलनाथ जैन मंदिरात व विश्वकल्याणक या ठिकाणी पर्युषण पर्वानिमित्त सप्ताहभर विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पर्युषण पर्व काळात जैन मंदिराची सजावट करण्यात आली होती तर विमलनाथ भगवान यांच्या मुर्तीस पुजारी मनिशंकर यांनी गुलाबाच्या फुलांच्या साहयाने सुशोभित केले होते. दर्शनासाठी पहाटे पाच वाजेपासून भाविकांची गर्दी होत होती.

समभावनेचा दिला संदेश
मंगळवारी जैन बांधवांनी एकजुटीने महावीर भगवंताच्या पाळण्याची शोभायात्रा गावाच्या मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आली. यावेळी महिलांची विशेष उपस्थिती होती. शोभायात्रे चा समारोप जैन मंदिरात करण्यात आला होता. पर्युषण पर्वाचे औचित्य साधून एकंदरीत जमलेल्या समाजबांधवांनी मंदिरातच उपस्थितीतांना क्षमायाचना केली. क्षमायाचनेचे महत्त्व विषद करतांना सांगितले की, दैनंदिन जीवन जगतांना अनेकप्रसंगी आपसात वैरभाव उत्पन्न होत असतात. प्रत्येकाने वैरभाव सोडून समभावना येण्याचा संदेश मानवतेने दिला आहे. वर्षभर होणारे एकमेकांशी भेदभाव कलह विसरून खरोखरच क्षमादान करणारा महान समजला जातो. इतिहासात भगवंतांनी अनेकांनी क्षमा केल्याचे उदाहरणे सापडतात क्षमापणाच्या दिवशी सर्वांनी क्षमा मांगून प्राणीमात्रांवर दया करावा असे आवाहन येथील जैन बांधवांनी केले या कार्यक्रमात महिलांसह बांधवांची उपस्थिती होती.