बळीराजाची करूण कहाणी : 2 रूपये किलो कोथिंबीर आणि डोळ्यात पाणी!

0

दोंडाईचा (जरपालसिंग गिरासे)। दुष्काळ, अवकाळी पाऊस, निर्सगाचा लहरीपणा, वाढलेले बियाणे व खतांचा दर व्यापार्‍याकडून होणारी लुट आणि अहोरात्र श्रम करून थकलेले शरीर, दिवसागणिक वाढणारा कर्जाचा बोझाने झुकलेला शेतकरी, कृषी मालाला हमीभाव नसल्याने व्यापार्‍याकडून होणारी लुट आता बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. आठ ते दहा दिवसापासुन दोंडाईचा येथील लिलावात मातीमोल भावात कोंशिबीरची विक्री होत आहे. 2 रूपये ते 6 रूपये प्रति किलो या दराने व्यापारी कोंशिबीरची खरेदी करीत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी फुकट कोंशिबीर वाटून टाकली. तर अनेकांनी बाजारातील मोकाट जनावरांना खाऊ घालुन पुण्य केल्याचे बोलून दाखविले. मागील महिन्यात 200 रूपये प्रति किलो या दराने कोंशिबीरची विक्री केली जात असल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर कोंशिबीरची लागवड केली. यामुळे मोठ्याप्रमाणावर आवक झाल्याने कोंशिबीरचे भाव पडले असे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले.

कृषी मालाला हमी भाव देण्याची मागणी
यावेळी काही शेतकरी बांधवांना जनशक्तीला सांगितले की, अनेक मोर्चा झाले पुढार्‍यांनी राजकारण केल.े मात्र शेतकर्‍यांचा समस्या सुटल्या नाहीत. यंदा कापसावर बोंड अळीचा मारा चालु असल्याने कपाशीच्या दोन ते तीनच वेचण्या होवु शकल्या हे नुकसान मोठे असतांना कापसाला कवडीमोल भाव चिंतेचे कारण ठरले आहे. धुळे जिल्हातील अनेक साखर कारखाने बंद असल्याने उसाला मागणी नाही. भाजीपाला तर मातीमोल भावात व्यापार्‍यांची दाढी धरून विकावा लागतो. कर्जमाफीचे नेमके काय कळायला मार्ग नाही तर हे सरकार बळीराजा कडून काही करायला तयार नाही. त्यामुळे शेतीमालाला हमी भाव असावा त्याशिवाय शेतकरी जगणार नाही अशी मागणी काही शेतकर्‍यांनी केली.

हमी भाव द्या
अनेक शेतकर्‍यांना भांडवल, मजुरी तर दुरच पण बाजारापर्यंत गाडी भाडे सुध्दा न निघाल्याने अनेकांनी व्यापार्‍यांकडून उचल करत गाडी भाडे दिले. कोंशिबीरचे बियाणे, पेरणी खर्च, फवारणी, मेहनत मजुरीचा हिशोब करता भरघोस उत्पादन होवुन देखील शेतकरी कृषी मालाच्या हमी भावाअभावी कर्जबाजारीच होत आहे. कारण मालाला हमी भाव नाही तेथे खर्च निघेल याची शास्वती कोण देणार, मात्र दुसरी कडे व्यापारी काही न करता प्रति किलो 4 ते 5 रूपये नफ्यात आहेत.

हमी भाव द्या
अनेक शेतकर्‍यांना भांडवल, मजुरी तर दुरच पण बाजारापर्यंत गाडी भाडे सुध्दा न निघाल्याने अनेकांनी व्यापार्‍यांकडून उचल करत गाडी भाडे दिले. कोंशिबीरचे बियाणे, पेरणी खर्च, फवारणी, मेहनत मजुरीचा हिशोब करता भरघोस उत्पादन होवुन देखील शेतकरी कृषी मालाच्या हमी भावाअभावी कर्जबाजारीच होत आहे. कारण मालाला हमी भाव नाही तेथे खर्च निघेल याची शास्वती कोण देणार, मात्र दुसरी कडे व्यापारी काही न करता प्रति किलो 4 ते 5 रूपये नफ्यात आहेत. यातून व्यापार्‍यांनाच फायदा होत असून शेतकरी मात्र वंचित राहत आहे.