बळीराजाची सनद सरकारला पोहचवा राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

0

धुळे । महाराष्ट्राच्या बळीराजाची सनद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तयार केली आहे. ती सरकार पर्यंत पोहचवावी या मागणीसाठी दि.10 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर बसून ठिय्या आंदोलन केले. बळीराजाला वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रस पक्ष संघर्ष करीत आहे. बळीराजासाठी राष्ट्रवादीने सर्व विरोधी पक्षांना एकत्र करीत संघर्ष यात्रा काढली होती. यानुसार शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी आंदोलन कर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी निवेदन देऊन सनद सादर केली

भाजपाचे शेतकर्‍यांकडे दूर्लक्ष
राज्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले असतांना केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शेतकर्‍यांची कर्जमाफी न होवून 7/12 कोरा झालेला नसल्याने नव्या हंगामात शेती करणे अशक्य झाले आहे. एकूणच राज्यातील शेतकर्‍यांची अवस्था गंभीर असून बळीराजाची सनद शासनाने मान्य करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनातुन करण्यात आली आहे.

यांचा होता सहभाग : आंदोलनात राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, शिंदखेड्याचे माजी आ.रामकृष्ण पाटील, अ‍ॅड.रविंद्र पाटील, कैलास चौधरी, आर.बी.माळी, ज्योती पावरा, लहू पाटील, मोहन नवले, अमोल मासुळे, कुणाल पवार, प्राचार्य भदाणे, सत्यजित सिसोदे, कांतीलाल दाळवाले, रईस काझी, जगदीश गायकवाड, गुलाबराव पाटील, एन.सी.आबा, दादा खताळ, कुंदन पवार, महेंद्र सरगर, किशोर सरगर आदी सहभागी झाले होते.

शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार : राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकर्‍याला वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना सोबत घेवून गेल्या चार महिन्यांपासून राज्यात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण केली आहे. त्यासाठी बळीराजाची सनद या नावाने जवळपास 13 प्रमुख मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत.