बळीराजाची १ लाखांची फौज मुंबईत उतरविणार

0

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने चर्चासत्र

मुंबई – बळीराजाची १ लाखांची फौज मुंबईत उतरविण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत केली. शेतकरी हिताची २ विधेयके संसदेत सादर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली २ खासगी विधेयके संसदेत मांडण्यात येणार आहेत. त्यापूर्वी शेतकऱ्यांची तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी संपूर्ण देशात विधेयकावर विचार मंथन सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने मुंबईमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचीही उपस्थिती होती. राज्यातील १ लाख शेतकऱ्यांनी मुंबईत दाखल होऊन विधेयकाच्या बाजूने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन या चर्चासत्रातून करण्यात आले.

केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार हेच खरे शेतकऱ्यांचे शत्रू असल्याचा सुर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या चर्चासत्रात निघाला. केंद्रात सत्तते आलेल्या भाजपाने निवडणूकी पूर्वी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव ही घोषणा केली होती. भाजपा सत्तेत येऊन ३ वर्षे होऊन गेली तरी अजून त्याचे काहीही झालेले नाही. निवडणूकीपूर्वी दिलेल्या घोषणा देखील पूर्ण करू न शकणारे हे सरकारच शेतकऱ्यांचे खरे शत्रू आहेत असे मत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांची कर्जमूक्ती व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पादित केलेल्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव द्यावा या मागणीसाठी संसदेत दोन खाजगी विधेयक मांडण्यात येणार आहेत. संसदेत खाजगी विधेयक मांडण्यापूर्वी संपूर्ण देशात या विधेयकावर चर्चा व्हावी यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. आज मुंबईतील कुलाबा येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात हे चर्चासत्र पार पडले. यावेळी संपूर्ण देशातून शेतकरी नेते तसेच शेतीतील तज्ञांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. यावेळी राजू शेट्टी म्हणाले, की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचा कोणताही विचार करत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकार फक्त खाणाऱ्याचाच विचार करीत आहे, मात्र पिकवणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हिताच्या विधेयकांना शहरातील नागरिकांचाही पाठिंबा मिळावा, यासाठी यासाठी येत्या महिनाभरात नवी मुंबई ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.