चोपडा। अधिवेशनात विरोधी पक्षाच्या अमदारांनी राज्यातील शेतकर्यांना कर्ज मुक्त करून सात बारा कोरा मिळावा अशी मागणी अखेर पर्यत करण्यात आली शेवटच्या दिवशी अर्थ संकल्प मांडण्यात आला त्या दिवशी शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा होईल म्हणून शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु शेवटी शेतकर्यांना वार्यावर सोडण्यात आल्यामुळे आता तालुक्याच्या शेतकरी कृती समितीच्या सदस्यांनी तहसिलदार दिपक गिरासे यांना निवेदन दिले.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
पडलेला दुष्काळ व शेतमालाचे पडलेले भाव लक्षात घेता शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी जळगाव खान्देश शेतकरी कंपनी मार्फत तुर खरेदी केंद्र सुरू होते त्यांनी दोन हजार क्किंटल तुर खरेदी करण्यात आली अजुन 250 क्किंटल खरेदी करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकर्यांकडे चार हजार क्किंटल तुर शिल्लक आहे. त्यासाठी नाफेड मार्फत नविन केंद्र सुरू करून बारदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना एस.बी. पाटील, संभाजी पाटील, अॅड. एस.डी. सोनवणे, संजीव बाविस्कर, रमेश सोनवणे, जगन्नाथ पाटील, वसंत पाटील, प्रशांत पाटील आदि उपस्थित होते.