बसखाली चिरडून चिमुरडी मृत्युमुखी

0

पुणे : स्कूलबस मागे घेताना बसखाली चिरडून चार वर्षांची चिमुरडी मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे घडली.

चैतन्या नितीन मासाळ असे या चिमुरडीचे नाव आहे. बसचालक मोहन दगडू नाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डोर्लेवाडीतील संत तुकाराममहाराज इंग्रजी मेडियम स्कूलमध्ये ती नर्सरीत होती. सकाळी ती शाळाच्या दारात उतरली. काही वेळाने शाळेतील शिक्षिकांना ती बसच्या मागे पडलेली दिसली. नाळे बस शाळेजवळ लावून निघून गेला होता. शिक्षिकांनी आजूबाजूच्या लोकांना बालोवून चैतन्याला दवाखान्यात नेले. तेथे ती मुृत्यमुमुखी पडल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.