चाळीसगाव । चाळीसगाव बस आगाराचे चालक व शिवशक्ती नगर, टाकळी प्र.चा. येथील रहीवाशी असलेल्या करगांव मोरीच्या पुढे असलेल्या कि.मी. खांबा क्र. 329/3 जवळ धावत्या रेल्वेखाली सापडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिवशक्ती नगर टाकळी प्र.चा. येथील रहीवाशी व चाळीसगांव एस.टी. डेपोचे चालक धनराज लक्ष्मण पाटील (37) यांचा मृतदेह 18 रोजी पहाटे 6:45 वाजेच्या सुमारास चाळीसगांव रेल्वे स्टेशन च्या पुढे करगांव मोरीजवळ डाउन रेल्वे लाईन वर कि.मी. खांबा क्र. 329/3 च्या जवळ मिळून आला आहे. धावत्या रेल्वे खाली सापडून त्यांचा मृत्यू झाला असून चाळीसगांव रेल्वे स्टेशन मास्तर यांनी खबर दिल्यावरून चाळीसगांव रेल्वे पोलीस स्टेशनला 5/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार एस.आर. शहापुरकर करीत आहेत.