बसच्या चाकात अडकून बहीण, भाऊ ठार

0

औरंगाबाद : औरंगाबाद – अहमदनगर महामार्गावरील ढोरेगाव शिवारात खासगी बसच्या सीटखालील प्लायवूड निखळल्याने बहीण व भावाचा बसच्या चाकात अडकून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

कुलस्वामिनी ट्रॅव्हल्स कंपनीची पुणे-रावेर ही बस गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव शिवारातून जात असताना, अचानक बसमध्ये सीटखालील प्लायवूड तुटले. यामुळे सीटवर बसलेले गजानन सुरेश मराठे (27) व वरुणा सुरेश मराठे (40, दोघे रा. जि. जळगाव) हे दोघे बसच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसचालक संजय वाडे यास गंगापूर पोलिसांनी अटक केली. वाडे यास न्यायालयाने 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.