बसच्या धडकेत एक जण ठार

0

अमळनेर । तालुक्यातील धुळे अमळनेर रस्त्यावरील जानवे गावाजवळ रविवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सकाळी शेतात जाणार्‍या तरुणाला बसने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना घडली. तालुक्यातील जानवे येथील रहिवासी भरत दौलत पाटील (वय-40) हा गावातून सकाळी पायी धुळे रस्त्याने शेतात जात असताना मागून अमळनेर हुन धुळे कडे जाणारी अमळनेर सुरत बस क्र (एमएच 20 बीएल 3174) वरील चालकाने पायी जाणार्‍या तरुणास मागून धडक दिल्याने मयत भरत गंभीर जखमी झाला होता. यावेळी त्याला उपस्थित नागरिकांनी धुळे येथे उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला, परंतु धुळे जात असताना रस्त्यात नवलनगर जवळ त्याचा मृत्यू झाला. नाटेश्‍वर बाबूलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चालक एस.आर. पाटील विरुद्ध भादवि 304 अ, 279, 337, 338 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पीएसआय गोकुळ पाटील व पोलीस नाईक विजय साळुंखे करीत आहेत.