बसच्या धडकेत पादचारी ठार

0

भोसरी ः रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला खासगी बसने जोरदार धडक दिल्याने पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी पुणे-नाशिक मार्गावर पांजरपोळ गेटसमोर घडली. तुकाराम भालेराव (वय 51, रा. इंदोरी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. भालेराव गुरूवारी दुपारी चार वाजता पांजरपोळ गेटसमोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका खासगी बसने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. बस चालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. भोसरी ठाण्याचे फौजदार चामले अधिक तपास करत आहेत.

* ज्ञानदिपमध्ये स्नेहसंमेलन
पिंपरी ः येथील ज्ञानदीप नर्सारी स्कूलचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यावेळी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांमध्ये लहानपणापासून व्यासपीठ निर्भयता यावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे शाळेच्या संचालिका अरूणा कुंभार यांनी सांगितले. प्ले ग्रुपमधून प्रथम क्रमांक मिहिर सुर्यवंशी (आदीवासी), दुसरा क्रमांक ओवी कोकीळ (मिस वर्ल्ड) तर तिसरा क्रमांक विभागून युवराज परब (शिवाजी महाराज) व आरोही निगडे (भाजीवाली) यांनी मिळविला. नर्सरी ग्रुपमधून प्रथम क्रमांक जिनल चौधरी (झाशीची राणी), सिद्धी डेंगळे (देवसेना) तर तिसरा क्रमांक कुणाल चौधरी (आर्मी आफिसर)÷ व कार्तिक दोडामणी (वारकरी) यांना विभागून देण्यात आला. परिक्षक म्हणून मनिषा देशमुख यांनी काम पाहिले. फॅन्सी डे्रेस नंतर नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यासाठी अमृता सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. कार्यक्रमासाठी धनश्री डेंगळे, कला आरगडे, किरणकुमार राजे व स्मिता राजे यांनी विशेष सहकार्य केले.