Girl student injured in Muktainagar collision with speeding Bus : Bicycle crushed मुक्ताईनगर : शहरातील स्टेट बँकेजवळ बसने एका विद्यार्थिनीला धडक दिल्याने ती यात जखमी झाली. सोमवारी सकाळी हा अपघात घडल.
सायकलीचा झाला चुराडा
शहरातील स्टेट बँकेजवळ 12 वर्षाच्या मुलीस बसने धडक दिली. यात त्या मुलीच्या सायकलीचा चेंदामेंदा झाला असून विद्यार्थिनी जखमी झाली. शेगाव ते नवापूर बस (एम.एच.14 बी.टी.410) ही वेगाने जात असतांना ऋतुजा राजेंद्र कोल्हे या विद्यािनिीला बसने धडक दिली. यात विद्यार्थिनीच्या सायकलीचा चुराडा झाला तर ऋतुजा जखमी झाली. तिला उपचारासाठी रूग्णालात दाखल करण्यात आले.
नागरीकांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन ऋतुजाला तत्काळ रुग्णालयात पाठविले. मुक्ताईनगरात बेशीस्त वाहतुकीमुळे अपघातात वाढ झाली आहे. अपघात प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संबंधीत बस ही नवापूर आगाराची असल्याची माहिती आहे.