बसने चिरडल्याने ६ शाळकरी विद्यार्थी ठार

0

लखनऊ-उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेवर शाळकरी विद्यार्थ्यांना बसने चिरडले आहे. कन्नोज येथे हा आज सकाळी हा अपघात झाला. अपघातात सहा विद्यार्थ्यांचा जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांनी जवळच्याच रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. बसमधील डिझेल संपले असल्या कारणाने विद्यार्थ्यांची बस थांबली होती. यावेळी एका बसने विद्यार्थ्यांना चिरडले ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.