बसने पेट घेतल्याने एसटी महामंडळाच्या कार्यपध्दती बाबतच्या समस्यांमध्ये वाढ

0
‘शिवशाही‘ बस जळून खाक
कासारवाडीतील रविवारी सकाळची घटना; प्रवासी नसल्याने जिवीतहानी नाही…
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बसने कासारवाडीजवळ अचानक पेट घेतला. यामध्ये बस जळून खाक झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्यानेे कोणतीही जीवितहानी झाली नाही. भोसरी येथून शिवाजीनगरच्या दिशेने बस जात होती. मात्र, अचानक सकाळी सातच्या सुमारास कासारवाडी याठिकाणी बसने पेट घेतला. रात्री भोसरी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बस मुक्कामी होती. या प्रकारातून शिवशाहीच्या दुर्घटना वारंवार घडत वाढत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये या बसने पेट घेतल्याने एसटी महामंडळाच्या कार्यपध्दती बाबतच्या समस्या वाढू लागल्या आहेत.