ठाणे । महाराष्ट्र प्रदेश बसपा प्रभारी अशोक सिंह यांनी गैरव्यवहारप्रकरणी आवाज उठवला आहे. याप्रकरणावर त्यांनी एस वार्डमधील गैरव्यवहारप्रकरणी एस.वार्डचे सहाय्यक आयुक्त संतोष धौंडे यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी भेट नाकारत उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकार्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र एस. वार्डचे सहाय्यक आयुक्त संतोष धौंडे न आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा येत्या सोमवारी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.