हडपसर ते सांगवी फाटा दरम्यानचा प्रकार
पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करत असताना एका महिलेच्या गळ्यातील सहा तोळे सोन्याचे पेंडंट लंपास केले. ही घटना हडपसर ते सांगवी फाटा बस प्रवासादरम्यान बुधवारी (दि. 21) रोजी भर दुपारी घडली आहे. शोभा प्रकाश दीक्षित (वय 50, रा. कुंजीरवाडी, पेठकर वस्ती हवेली) यांनी अज्ञात इसमाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित या सकाळी 11 वाजता हडपसर बस स्थानकावरून बसमध्ये बसल्या. 12 वाजण्याच्या सुमारास सांगवी फाटा येथे उतरल्या. दरम्यान, त्यांच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे सोन्याचे पेंडंट अज्ञाताने चोरले असल्याचे निदर्शनास आले. त्यांना सुमारे एक लाख 80 हजारांचा फटका बसला. तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.