बसमध्ये सोनसाखळी लांबवताना जळगावच्या महिलेला अटक

0

मुक्ताईनगर- बसमध्ये चढताना महिलेची सोनसाखळी चोरताना एका महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले तर सोबतचा साथीदार पुरूष मात्र पसार झाल्याची घटना मुक्ताईनगर बसस्थानकात 1 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी नंदाबाई प्रल्हाद सोनवणे (रा.जळगाव) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा साथीदार मात्र सोनसाखळी घेवून पसार झाला आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शोभाबाई सदाशिव तायडे (रा.नवी दाभाडी, ता.जामनेर)या बसस्थानकात बसमध्ये चढत होत्या. यावेळी अनोळखी पुरूषाने त्यांच्या गळ्यातील 9 हजारांची तीन ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबवली. हा प्रकार शोभाबाईंच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. यांतर नागरीरकांनी नंदाबाई सोनवणे यांना पकडले. तर अनोळखी पुरूष सोनसाखळी घेवून पळून गेला. याप्रकरणी शोभाबाई तायडे यांचे फिर्यादीवरुन नंदाबाई व अनोळखी पुरूषाविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार सादीक पटवे करीत आहे.