जळगाव । बस वाहक यांनी एकास बसमध्ये जागा असल्याचे सांगत मागे बसा असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपीने बसवाहकास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी चालक रोशन लक्ष्मण तायडे (वय-32) आणि वाहक महेंद्र एकनाथ पाटील (वय-26) रा. नशीराबाद हे बसमध्ये ऑनड्यूटी होते. बसमध्ये प्रवाशी अधिक असल्याने मार्ग बसमध्ये सिट रिकामे असल्याचे सांगत आरोपी आरोपी मजहर अकबर खान (वय-45) रा.भुसावळ याचा राग आल्याने वाहक पाटील यांना मारहाण केल्याचा प्रकार 10.45 वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.