बसवाहक कोतकार यांनी हरवलेली बॅग केली परत

0

नवापूर । आजचा काळात इमानदारी शिल्लक राहील राहीलेली नाही असे बोलले जाते. माञ ते खोट ठरते ते इमानदार पणाचा आलेल्या प्रत्ययवरून आणि आपण त्यावेळी नाही, इमानदारी आज ही शिल्लक आहे. नवापुर डेपोची एसटीबस शिर्डी-नवापूर पहाटे पाच वाजता शिर्डी येथुन निघाली, मनमाड येथून एक मुस्लिम जोडपे बसमध्ये बसले होते व ते सटाणा येथे उतरले, परंतु त्यावेळी त्या मुस्लिम स्त्रीचे दागिन्यांची बॅग गाडीतच राहिली होती. बॅग बसवाहक संजय विश्वनाथ कोतकर (पिंपळनेर) यांना गाडीत आढळली. कोतकर यांनी बॅग कोणाची राहीली याबाबत विचारणा केली. माञ ती बॅग आमची नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. अखेर ती बॅग कोतकर यांनी नवापूर डेपो मॅनेजर राजेंद्र अहिरे यांच्या कडे जमा केली. यावेळी बॅग उघडुन तपासणी करण्यात आली त्यानंतर त्या मुस्लिम जोडप्यांचा बॅगेत असलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे फोन लावुन त्यांना बॅगे विषयी माहिती देण्यात आली. फोनवर बोलावून ती बॅग त्यांचा स्वाधीन केली.