बससेवा पूर्ववत केल्याबद्दल आगार प्रमुखांचे आभार

0

चाळीसगाव । मागील महिन्यात 25 जुलै रोजी टाकळी (प्र.दे.) ता. चाळीसगाव येथुन बससेवे बाबद होणार्‍या समस्येचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे चाळीसगाव बस आगार प्रमुखांना देण्यात आले होते. त्या त्याची दखल घेऊन बससेवा पुर्वरत केल्याबद्दल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने त्यांचे जाहीर आभार करतांना राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, प्रविण जाधव, शुभम पवार, सौरभ त्रिभुवन, प्रणाल पवार, गणेश महाजन, एजाज सैयद, नीरज अजबे, संदीप मोरे आदी.