बसस्थानकातच अपघात, आठ जखमी

0

भुसावळ। मुक्ताईनगर बसस्थानकातच चालकाने भरधाव बस चालवून काँक्रिट कॉलमला धडक दिल्याने बसमधील निर्मलाबाई दगडू ब्राह्मणे (केकतनिंभोरा) यांच्यासह आठ प्रवासी जखमी झाले. हा अपघात 10 जुलै दुपारी 12.10 वाजता घडला.

अपघातानंतर तब्बल दिड महिन्यांनी तक्रारदार फकिरा वसंत पानपाटील पोलिसात हजर झाल्याने त्यांच्या तक्रारीवरुन बसचालक मनोज रघुनाथ नेटके (36, जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नेटके यांनी बस (क्र.एम.एच.19 बी.टी.1643) भरधाव वेगात काँक्रिट पिलरला ठोकली.