जळगाव । शहरातील दोनवर्षा पुर्वी महाराष्टाचे प्रमुख यांनी बसस्थानकावर हिरकणी कक्ष उभारला व त्यांची स्थापना करण्यात आली. एसटी ने प्रवास कराणार्या महिला व बाळाला आरोग्य व स्तनपान करण्याची सोय व्हावी हा हेतू या कक्षाच्या होता. परंतू शहरातील बसस्थानकांवर हा हिरकणी कक्ष बंद असल्याचा दिसून येत आहे. व या कक्षात कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.
ज्यामुळे महिलांना किंवा मातेला स्तनपान करण्यात अडचण निर्माण होते. महिलांची गैरसोय होत आहे. कक्ष असून सुविधे अभावी या योजनेचा लाभ महिला घेवू शकत नाही. या कक्षाचा वापर होत नसल्याने या कक्षात अस्वच्छता दिसून येते. या कक्षात सुविधा व वेळोवेळी स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अनेक महिलांना आपल्यासाठी असा कोणत्या कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची माहिती नसल्याने ते या चांगल्या सुविधेपासून वंचित राहतात आहेत. महिलांमध्ये या कक्षाबाबत जनजागृती होण्यासाठी एसटी महामंडाकडून प्रयत्न करण्याची गरज आहे.
ज्यामुळे महिलांना त्याचा संपुर्ण लाभ घेता येईल.
जनजागृतीची मागणी
बसस्थानकावर दोन टी.व्ही स्क्रिन सरकारी जाहिरात करण्यासाठी लावण्यात आल्या आहेत. या दोघां टि÷.व्ही. स्क्रिनवरून जर हिरकणी कक्षाची माहिती देण्यात आली व अनाऊशिंग करतांना माहिती देण्यात आली तर निश्चतच या कक्षेचा फायदा महिला प्रवाशांना होणार आहे .बसस्थानक प्रमुख महिला असल्याने महिलांच्या समस्यांना समजू शकतील. त्यांनी या समस्या कडे लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी महिला प्रवाशान कडून करण्यात आली.