बसस्थानकात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी ..
जयंतीच्या निमित्ताने पर्यावरण जागर प्रतिष्ठानने केले वृक्षारोपण
भुसावळ
येथील एसटी महामंडळाच्या भुसावळच्या बस स्थानकात भुसावळ शहरातील प्रतिष्ठित व्यापारी संघाचे अध्यक्ष व राधेकृष्ण परिवार प्रभात फेरीचे प्रमुख राधेश्यामजी लाहोटी यांच्या हस्ते महात्मा गांधी व स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करण्यात आले . यावेळी त्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांनी केल्या कार्याविषयी गौरवउद्गार काढून वर्षभर आपण त्यांचं पालन करावे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले .या प्रसंगी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर उपस्थित होते .एसटीचे आगार प्रमुख राकेश शिवदे यांनीही एसटी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली .
आगार प्रमुख राकेश शिवदे बस स्थानक प्रमुख प्रकाश भोई साहेब धर्मराज देवकर सागर देवकर सुनील पाटील सुलेमान तडवी जगन गोसावी कांतीलाल कंडारे शांताराम चौधरी अनिल सपकाळे सतीश बोंडे जितेंद्र डोळसे श्रीमती किरण तायडे इरफान तडवी सुरेंद्रसिंग पाटील आदी उपस्थित राहून सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना पाटील सर यांनी तर आभार प्रकाश भोई साहेब यांनी केले .