आराम कक्षात दारूच्या बाटल्या : प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न
भुसावळ- भुसावळ बसस्थानकावर लांबपल्ल्याच्या बसेसवरील बसचालक व वाहक यांना काही काळ विश्रांती करण्यासाठी आराम कक्ष उभारण्यात आला आहे.मात्र या आराम कक्षात कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने चालक व वाहकांना अडचणीचा सामना करावा लागतो.तसेच या आराम कक्षात रीचवलेेल्या दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत.यामूळे चालक मद्यप्राशन करून बसेस चालवत असल्याचे समोर येत आहे.या प्रकाराने प्रवाशांच्या सुरक्षीत प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य परीवहन महामंडळाच्या माध्यमातून बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या मार्गावरील व स्थानकावरील बसचालक व वाहकांना काही वेळ विश्रांती करण्यासाठी आराम कक्ष उभारण्यात आला आहे.मात्र या आराम कक्षात कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने चालक व वाहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.यामूळे चालक व वाहकांना आराम न करताच पुढील प्रवासाला बसेस घेवून मार्गक्रमण करावे लागत असल्याने त्यांच्या मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.तसेच अशा विविध कारणांनी बसमधील प्रवाशांची संख्याही कमालीची घटली असल्याने परीवहन महामंडळाच्या या आगाराला तोटा सहन करावा लागत आहे.यामूळे आगारप्रमुखांनी या प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रीकाम्या दारूच्या बाटल्या
लांब पल्ल्याच्या बसेसवरील चालक व वाहकांना रात्रीच्या मुकामासाठी पंधरा बंगला रोडवरील बस आगारात मुक्कामाची व्यवस्था आहे.तर दिवसा काही वेळापुरते आराम करण्यासाठी बसस्थानकावर आराम कक्ष आहे.मात्र,या बसस्थानकावरील आराम कक्षात विविध बॅ्रंडच्या दारूच्या बाटल्या दिवसा चालक व वाहकांकडून रीचवल्या जात असल्याचे आराम कक्षात पडलेल्या रीकाम्या बाटल्यांवरून दिसून येत आहे.यामुळे चालक अथवा वाहक मद्यपान करून बसेस चालवत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षीत प्रवासाचा प्रश्न निर्माण झाले असून आगारप्रमुखांनी या प्रकाराकडे जातीने लक्ष देण्याचे गरजेचे आहे.
महीला पोलीस मदत केंद्र असते बंदावस्थेत
बसस्थानकावरील महीला प्रवाशांच्या मदतीसाठी बाजारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत महीला मदत केंद्र पोलीस चौकी उभारण्यात आली आहे.मात्र महीला प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी व तक्रार निवारण करण्यासाठी उभारण्यात आलेले महीला पोलीस केंद्र सतत बंदावस्थेत असल्याने महीला मदत केंद्र केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे.यामूळे महीला प्रवाशांना काही तक्रार नोंदवायची असल्यास बाजारपेठ पोलीस ठाणे गाठावे लागते.
हिरकणी कक्ष नावालाच
प्रवासा दरम्यान स्तनदा मातांना आपल्या बाळास स्तनपान करता यावे यासाठी राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर राज्य परीवहन महामंडळाने हिरकणी कक्ष निर्माण केले आहेत.यामध्ये भुसावळ बसस्थानकावरील हिरकणी कक्षाचाही समावेश आहे.मात्र उभारण्यात आलेल्या या हिरकणी कक्षाची स्तनदा मातांना माहीती दिली जात नसल्याने कक्ष सतत बंदावस्थेत राहत असल्याने हा हिकरणी कक्ष केवळ नावालाच असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पाण्याच्या टाकीतही रीकाम्या बाटल्या
बसस्थानकाच्या छतावर बसस्थानक प्रशासनाने पाण्यासाठी एक फायबरची मोठी टाकी ठेवली आहे.मात्र या टाकीत पाण्याचा एक थेंबही नसतो यामूळे स्थानकावरील प्रवाशी, चालक व वाहकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.तसेच या पाण्याच्या टाकीतही रीचवलेल्या दारूच्या व पाण्याच्या बाटल्या टाकल्या जात असल्याचे दिसून येत आहे.तसेच बसस्थानकावरील डांबरीकरणाची दुरावस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत.प्रवाशांना अडचणीचा सामना करीत आपल्या इच्छीत बसकडे धाव घ्यावी लागत असल्याने प्रवाशी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानकावरील बाकांचीही दुरावस्था
बसस्थानकावर बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी बाके बसवण्यात आली होती.मात्र या बाकांचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने प्रवाशांना उभे राहूनच बसची प्रतिक्षा करावी लागत आहे.यामध्ये महीला प्रवाशी वर्गाला मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशा विविध कारणांनी बसस्थानकावरील सोयीसुविधांचे वाभाडे निघत आहे.