बसस्थानकावर खड्डे; प्रवाशांच्या जीवाला धोका

0

जळगाव (सपना पवार) । खाजगी वाहन धारकांच्या मनमानी कारभारामुळे तसेच खाजगी वाहनांच्या असुरक्षित प्रवासामुळे सामान्य नागरिक कंटाळला आहे. खाजगी वाहनाने प्रवास करणे हे दिवसेदिवस धोकेदायक होत असल्याने सामान्य मानसांना सुरक्षित आणि विश्‍वसनीय वाटत असलेले एकमेव प्रवासाचे साधन म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या हेच आहे. परंतु एसटी महामंडळाच्या गाड्या हे शालेय विद्यार्थ्यांसाठी तापदायक ठरत आहे. जळगाव शहर हे जिल्ह्याचे शहर असल्याने या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावाहून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांसाठी खाजगी बसने प्रवास करणे धोकेदायक ठरत असल्याने पालकवर्गाकडून विद्यार्थ्यांना एसटी बसचे पास काढून देण्यात आले आहे. परंतु विद्यार्थी एसटी बसने देखील सुखाने प्रवास करत नसल्याचे चित्र दिसून येते. एसटी बस विषयी सामन्यांची तक्रार दिवसेंदिवस वाढत आहे.

जीव धोक्यात टाकून जागेसाठी धडपड
शहरात शिक्षणासाठी येणारे शालेय विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी सकाळपासून बसस्थानकावर उभे असतात. विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असतात. शालेय विद्यार्थी आणि इतरांसाठी एकच बस असल्याने विद्यार्थ्याना बसण्यासाठी जागा देखील मिळत नसल्याचे तक्रार विद्यार्थी वारंवार करतात. बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी जीवघेणी कसरत करतात. विद्यार्थी बसच्या खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे विद्यार्थ्याना इजा होऊन धोका पोहचण्याची शक्यता अधिक असते.

बसमध्ये अस्वच्छता
राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यामध्ये ‘धुम्रपान करण्यास सक्त मनाई’ आहे असा संदेश दिलेला असतो. परंतु एसटी प्रवासी आणि कर्मचारी दोघेही या नियमाचा पालन करीत नसतात. वाहन चालक आणि वाहन हे सर्रासपणे बसमध्ये धुम्रपान करतात आणि गुटखा खाऊन थुकतात. तसेच सिट, खिडक्यावर धुळ साचलेली असते. त्यामुळे महामंडळाच्या गाड्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेल्या आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर काही बसेस ह्या सकाळी पाण्याने धुतल्यानंतर त्या तस्याच प्रवासाला लागतात. त्यामुळे सीट हे पाण्याने आले असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यास अडचणी येवून ते उभे राहूनच प्रवास करीत असतात.

मुलींना अधिक त्रास
बाहेरगावाहून जळगाव शहरात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे. यामध्ये मुलींची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मुलींना बसने प्रवास करणे अधिकच त्रासदायक ठरत आहे. बसमध्ये जागा मिळावी यासाठी मुल हे खिडकीतून सिटवर दप्तर किंवा इतर वस्तु ठेवून जागा राखीव करुन घेतात. मुलींना मात्र उभे राहून प्रवास करावा लागतो. काही वेळेस मुल आणि मुलींमध्ये बसण्यावरून वाद देखील होतात. तर काही वेळेस टवाळखोळांकडून मुलींची छेडखानी देखील केल्याचे प्रकार घडत असतात.