बसस्थानक परिसरातून वृध्द महिलेची बॅग लांबविली

0

जळगाव । जळगावात नातवाच्या मित्रांच्या लग्नासाठी आलेली रावेर येथील वृध्द महिला बसस्थानकावर आल्यानंतर अन्नपुर्णा हॉटेलजवळ बसली होती. समोरच असलेल्या लहान चपलाच्या दुकानदाराला बॅगेवर लक्ष ठेवण्यास सांगून नातवाला फोन लावण्यासाठी वृध्द महिला गेली. हीच संधी साधून चोरट्याने वृध्द महिलेची पैसे, एक तोळे सोने असलेली बॅग चोरून नेली. मात्र, वृध्द महिला परतल्यानंतर बॅग गायब झाल्याने तिला धक्काच बसला. पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून काही मिनिटातच संशयित चोरट्याला ताब्यात घेतले.मथाबाई चौधरी (वय-75) ह्या रावेर येथे नातु सतिश रमेश चौधरी यांच्याकडे राहतात. सतिश चौधरी हे रावेर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर मथाबाई यांचा मोठा नातु धनराज चौधरी हे जळगावातील शनिपेठ परिसरातील चौघुल प्लॉट येथे राहतात.

मथाबाई चौधरी (वय-75) ह्या रावेर येथे नातु सतिश रमेश चौधरी यांच्याकडे राहतात. सतिश चौधरी हे रावेर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर मथाबाई यांचा मोठा नातु धनराज चौधरी हे जळगावातील शनिपेठ परिसरातील चौघुल प्लॉट येथे राहतात. मंगळवारी 16 रोजी धनराज यांच्या मित्रांचे लग्न असल्यामुळे मथाबाई ह्या रावेर येथून जळगावसाठी महामंडळाच्या एसटी बसने सकाळी 10.30 वाजता निघाल्या. दुपारी 1 वाजता जळगाव बसस्थानकावर आल्यानंतर त्या परिसरातील दुकानाजवळ त्या आल्या नंतर दुकानचालकाला नातवाला फोन लावण्यासाठी मोबाईल मागितला. मोबाईल दिल्यानंतर मथाबाई ह्या त्यांची बॅग चप्पल दुकानदाराजवळ ठेवून बाजुलाच मोबाईलवर बोलण्यासाठी गेल्या. नातवाशी बोलण झाल्यानंतर दुकानाजवळ मथाबाई परतल्यानंतर बॅग व दुकानदारही तेथून गायब होता. बॅग चोरीला गेल्याची सांगत त्यात 950 रुपये तसेच 1 तोळे सोने व औषधी, चाव्या असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर राजेंद्र मेढे, रवी नरवाडे, नाना तायडे, अजित पाटील आदी पोलिस कर्मचार्‍यांनी नवीन बसस्थानक गाठून काही वेळातच पोलिसांची चप्पल दुकानचालक राजेंद्र फकीरा डोळसे (वय-52 रा. आसोदा) याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली.