नवापुर । जालना-सुरत ही प्रवाशी बस जालना येथून सुरत येथे जात असतांना समोरील येणार्या कंटेनरच्या अतिप्रकाशामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याखाली उतरून झालेल्या अपघातात पाच प्रवाशी जखमी झाले. नवापूर तालुक्यतील सारवट गावाजवळ पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना उपजिल्हा रग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बस उतरवली रस्त्याखाली
सावरट गावाजवळ गुरुवारी पहाटे 4:30 वाजता एम एच -20 बी एल-3061 ही जालना आगाराची जालना-सुरत ही प्रवाशी बस जालना येथून सुरत येथे जात होती. राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर जवळील सावरट गावाजवळ समोरुन येणार्या कंटेनरच्या अती प्रकाशामुळे एस.टी बस चालकांने आपली बस रस्त्याच्या खाली उतरवली. बसमध्ये एकूण 9 प्रवासी होते पैकी 5 प्रवाशांन किरकोळ दुखापत झाली असुन त्यांना नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे.
जखमींची नावे
(1) जयश्री ज्ञानोबा शवंदाडे वय 45 गाव लातुर (2) सत्यभामा विष्णु येवले वय 57 गाव औरंगाबाद (3) मुत्ता दत्ताञय थोरमुळे वय 32 गाव लातुर(4) गणेश बळीराम टकले वय 33 बीड (5) आण्णा संपत शवंदाळे वय 65 बुलढाणा असे 5 प्रवाशांना किरकोळ जखमी झाले जखमींना डॉ.अमोल वळवी यांनी उपचार केलेत. अपघातबाबत एस.टी.बसचा अपघाताची माहीती चालक आर.जी .वाघ व वाहक इंदरसिंग सुंदरडे यांनी नवापुर एस.टी.आगारात मोबाइल दवारे माहिती दिली.घटनासळी नवापुर आगार प्रमुख राजेंद्र अहिरे,नाना भामरे,ज्ञानेशवर पवार,पोहचले त्यांनी नवापुर 108 रुग्णवाहीकेशी संपर्क करुन प्रवाशांना नवापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले.
जखमी प्रवाशांना मदत
जखमी पाच प्रवाश्यांनी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे एकूण 2500 रुपयाची तात्काळ मदत आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी दिलेत.या घटनेबाबतची माहिती चालक आर जि वाघ यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिली असून असून घटनेची नोंद करण्यात आली आहे.