हिमाचल । हिमाचल प्रदेशात एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातात 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. शिमला जवळील रामपूर येथे ही बस दरीत कोसळली. गुरुवारी सकाळी 9.15 वाजता ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली आहे.
शिमला जवळील रामपूर येथे घडली घटना
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींमध्ये बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचाही समावेश आहे. बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते. ही बस किन्नौर येथून सोलानला जात असताना रस्स्त्यातच ही दुर्घटना घडली. शिमलापासून 120 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 5 वर रामपूर येथे बसचा अपघात झाला. सूत्रांच्या माहितीनुसार बस ड्रायव्हरचा बसवरील कंट्रोल सुटल्याने बस दरीत कोसळली.