चोपडा । राज्य परीवहन महामंडळाच्या चोपडा आगारात बस कर्मचार्यांचा दर्जा मिळावा यासाठी संप करायचा की नाही याबाबत एस.टी. कामगार संघटना, इंटक संघटनासह संयुक्त कृती समितीतर्फे माहिती जाणून घेण्यासाठी मतदान घेण्यात आले. यात आगारातील कर्मचार्यांनी उत्स्फूर्त मतदान केले. दोन दिवस चालणार्या प्रक्रियेत 448 पैकी 419 कर्मचारीनी मतदान केले. या कामी डेपो सचिव पंडीत बाविस्कर, इंटकचे डी.डी. चावरे, अध्यक्ष रशीद शेख, कार्यध्यक्ष अतुल पाटील, कुंदन बोरसे, खजिनदार महेंद्र पठार, भगवान न्हायदे, डी.डी. कोळी, डी.वाय. पाटील, श्याम धामोडे, श्याम पाटील यांच्यासह कर्मचार्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.