वरणगाव। राष्ट्रीय महामार्गावरील आस्वाद हॉटेल समोर भरधाव वेगात बसने समोरुन येणार्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक माहिला जागीच ठार झाली असून एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी 18 रोजी सायंकाळी 5 .30 वाजेच्या सुमारास घडली. भुसावळ आगाराची बस क्रंमाक एम.एच.20 डी.9499 ची भुसावळ हतनूर बस वरणगावकडे जात असतांना वरणगावकडून भूसावळकडे जाणारी स्विप्ट कार क्रमांक एम.एच.19 ए.वाय.52 ला बसने समोरुन जबर धडक दिली. कारमधील रजीया इमादी वय 65 ही माहिला जागीच ठार झाली. तर मुराजाभाई वय 62 हा गंभीर जखमी झाला आहे. कारचालक मोहज भाई लहरी, सकीना इमादी वय 45 , हमजा इमादी 11 , तेहकुम इमादी वय 7 सर्व सुरत हे अपघातात किरकोळ जखमी झाले आहे.
जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी व नागरीकानी तात्काळ हलविले तेथे प्रथम उपचार करून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारात विलंब झाला या कारणाने वरणगाव येथीेल सुनील काळे याच्यासह कार्यकत्यांनी रुग्णाल्यास कुलुप ठोको आंदोलन केले. कारमधील प्रवासी बर्हाणपूर येथून जळगाव येथे जात असल्याचे समजते तसेच कारमधे लहान मुले सुध्दा होती. कार पूर्ण चक्काचूर झाली असून बसचा पुढील काच फुटून नुकसान झाले. बसचालकाचे नाव पान पाटील असल्याचे आगारातून समजले वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय जगदीश परदेशी , पीएसआय निलेश वाघ , पीएसआय प्रदिप ठुबे, पोहेकॉ सुनील वाणी, राहुल येवले , संदिप बळगे , कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी वाहतूक मोकळी केली व जखमीना रुग्णालयात पोहचविले.