बस चालकास बेदम मारहाण

0

निलंगा । राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर पोस्टर लावण्याच्या कारणावरून एका चालकास 10 ते 15 जणांनी बेदम मारहाण केली. निलंगा आगारात मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.निलंगा आगारात एका बसवर व्हीएस पँथरच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे पोस्टर लावण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. बसवर पोस्टर लावण्यास एसटीचे चालक सतीश तुगावे यांनी कार्यकर्त्यांना विरोध केला. त्यामुळे ‘तू विरोध का करतोस’ असे म्हणून दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली.