भुसावळ । भिवंडी येथे बस चालकास रिक्षाचालकांनी मारहाण केल्याने एस.टी. चालक गायकवाड यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ येथील बस डेपोतील कर्मचार्यांनी बसवाहतूक थांबवली. यात प्रामुख्याने एस.टी. कामगार संघटना, इंटक संघटना, कामगार सेना व कास्ट्राईब युनियनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
200 मीटर झोनची अंमलबजावणी करावी
भुसावळ बसस्थानक परिसरात देखील अशीच परिस्थिती असून उच्च न्यायालयाने बसस्थानकाच्या प्र्रवेशद्वारापासून 200 मीटरपर्यंत रिक्षा, अॅपे यांना मज्जाव केलेला आहे. न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. बर्याचवेळा रिक्षाचालक, अॅपेरिक्षा व कालीपिली चालक आणि बसचालक यांच्यात वादविवाद होवून चालकांना मारहाण करण्यात आलेली आहे. वाद पोलीस प्रशासनापर्यंत पोहचून अनेकवेळा तडजोड करण्यात आलेली आहे. एस.टी. व पोेलीस प्रशासनाने 200 मीटर झोनची अंमलबजावणी करावी, असे निवेदन 10 रोजी कर्मचार्यांनी आगार व्यवस्थापक संदिप पाटील यांना दिले. त्यात कर्मचार्यांना संरक्षण मिळावे व न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले. मृत एस.टी. चालक गायकवाड यांना श्रध्दांजली अर्पण करुन एस.टी. बसेस लगेच पुर्ववत सुरु करण्यात आला.