पाचोरा । भडगाव -पाचोरा रस्त्यावरील वडगाव फाट्याजवळ सोमवारी 3 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व ट्रकचा अपघात झाला. यात त्यात 10 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. चाळीसगाव आगाराची एमएच 20 बीएल 2410 या क्रमांकाची एस.टी.बस पाचोर्याकडून चाळीसगावकडे जात होती. तर एमएच 20 डीई 6087 या क्रमांकाची ट्रक भडगावकडून पाचोर्याकडे येत होती. एकमेकांवर आदळलयानेया अपघातात एस.टी.चा चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.