बस ट्रॅक्टरचा अपघात

0

चाळीसगाव । भडगाव तालुक्यातील वाडे कडुन चाळीसगाव कडे येणारी एसटी व चाळीसगावकडुन वाडेकडे जाणार्‍या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाल्याने दोघा चालकांसह बस मधील 3 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना तालुक्यातील न्हावे, ढोमणे गावादरम्यान वळणावरील पुलाजवळ घडली असुन ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. भडगाव तालुक्यातील वाडेकडुन चाळीसगावकडे येणारी बस क्र (एमएच 20 बीएल 0706) ही आज दिनांक 13 जानेवारी 2018 रोजी दुपारी 1-30 वाजेच्या सुमारास न्हावे ढोमणे गावादरम्यान वळणावरील पुलाजवळ आली असतांना समोरुन येणा-या शेणखतने भरलेल्या विना नंबर महिंद्रा टर्बो ट्रॅक्टरची व बसची समोरासमोर धडक झाल्याने ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर बसचे किरकोळ नुकसान झाले आहे या अपघातात बस चालक रविंद्र वामन माळी व ट्रॅक्टरचालकासह बस मधील 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, याप्रकरणी बस चालक रविंद्र माळी यांच्या खबरीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.