बस दरीत कोसळल्याने ३० जणांचा मृत्यू

0

डेहराडून-उत्तराखंडच्या पौडी-गढवाल जिल्ह्यात धूमाकोटजवळ मोठा अपघात झाला आहे. येथे एक बस दरीमध्ये कोसळली असून या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान २० जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात यश आले आहे. अन्य १२ जण जखमी असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एनडीआरएफचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे. जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्यात येत आहे. गढवालचे पोलीस आयुक्त दिलीप जवालकर यांनी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. क्वींस गाव येथून रामनगरला ही बस जात होती अशी माहिती आहे.