बस मार्ग पुन्हा सुरू करावा

0
चिंबळी : पीएमपीएलएमच्या राजगुरूनजर ते पुणेस्टेशन मार्गावर क्रं 357 या बसला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चांगले उत्पन्न मिळत आहे. पण हा बस मार्ग 3 सप्टेंबरपासून अचानक बंद केला आहे. राजगुरूनजर, चाकण, कुरूळी, चिंबळी येथील कामगार वर्ग व अनेक प्रवाशांना हे त्रासाचे ठरते आहे. भोसरी येथे जाऊन पुढील बस पकडावी लागत असल्याने कामावर जायला उशिर होतो. राजगुरुनगर व चाकण या ठिकाणी दिवसेंदिवस होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे बसला ठरलेल्या दिवसातील ठरलेल्या फेर्‍या पूर्ण करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ही सेवा फक्त राजगुरुनगर ते भोसरी अशी चालू ठेवण्यात आली आहे. यामुळे पुणे स्टेशनला जाणार्‍या प्रवाशांना भोसरीमध्ये उतरुन दुसरी बस पकडावी लागते. राजगुरुनगरला जाणार्‍या प्रवाशांना भोसरीमध्ये उतरुन राजगुरुनगर बसने पुढे जावे लागते. या निर्णयामुळे कामगार वर्ग, महाविद्यालयिन विद्यार्थी, वृद्ध नागरिक व प्रवासी या निर्णयांचा मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा बस मार्ग पुन्हा सुरू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.