चाळीसगाव । चाळीसगाव-धुळे महामार्गावर खडकी सिम व धामणगाव फाट्यावर धावत्या बसने तिनचाकी अपंगाच्या मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अपंग मोटारसायकलस्वारसह धामणगाव येथील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली असून मेहुणबारे पोलिसात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिती अशी की, तालुक्यातील धामणगाव येथील अपंग बांधव चंद्रकांत गोरख निकम (वय-35) व तात्यासाहेब काशिनाथ निकम (वय-50) हे दोघे अपंगाची असलेल्या 3 चाकी मोटारसायकल क्र. (एमएच 17 बीयू 7145) वरून चाळीसगााव धुळे महामार्गावरील खडकी सिम व धामणगाव फाट्यावरून धामणगावकडे जाण्यासाठी 8 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास जात असतांना धुळेकडून -औरंगाबाद कडे भरधाव बस क्रमांक (एमएच 20 बीएल 2845) ने त्यांच्या 3 चाकी मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक चंद्रकांत काशिनाथ निकम यांचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले तात्यासाहेब काशिनाथ निकम यांचा ग्रामिण रूग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असूून तपास शालिक कुंभार करीत आहे.