बस वेळेवर नसल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान

0

शिंदखेडा । शेवाळे, डेगावे,खर्दे येथिल शाळेकरी विद्यार्थी – विद्यार्थीनीची दि. 30 शुक्रवार रोजी सकाळी 8:30 वाजता शाळा सुरू झाल्यानंतर तसेच ब-याच दिवशी सकाळी व दुपारी दोंडाईचा आगार येथील बस वेळेवर येत नसल्यामुळे शाळेत जाणार्‍या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. व काही बस ड्रायव्हर बस थांबवत नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थी- विद्यार्थीनीनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा प. स. सदस्य शानाभाऊ सोनवणे यांच्यासह दोंडाईचा बस आगार येथे सकाळी ठिक 8:30 ते 9:30 वाजे पर्यंत दोंडाईचा आगार प्रमुख हे उपस्थित नसल्यामुळे त्याच्या दालना समोर बसून र्निदर्शने केली.

विविध मागण्यांसाठी निदर्शने
सोनवणे यांनी विद्यार्थीना शाळेत जाण्यास सांगितले व नंतर 10:30 वाजता आगार प्रमुख श्रीमती माधुरी याच्याशी चर्चा केली कि दररोज शाळेच्या वेळेप्रमाणे बस पाठवावी जेणेकरून विद्यार्थी- विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. विद्यार्थीनीना इयत्ता 12 वी पर्यंत मोफत बस पास मिळावी असे अनेक प्रश्नानवर चर्चा केली. दोंडाईचे आगार प्रमुख यांनी आश्वासन दिले की यापुढे असे होणार नाही बस वेळेवर येणार तरी र्निदर्शनास शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा प.स सदस्य शानाभाऊ सोनवणे सह उमेश पाटील, अशोक पाटील, हिम्मत गिरासे ,बाबाजी हाटकर ,सौरव पदमोर ,कल्पेश चव्हाण, भुषण पदमोर, रोहित चव्हाण, विद्यार्थीनी पुनम पाटील, सपना पदमोर ,जयश्री पदमोर, कल्याणी सोनवणे, दिपाली पदमोर जयेश मसळे सह शेवाळे, डेगावे व खर्दे येथील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते