बस व ट्रकच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू

Unknown Ismas was crushed by a truck near Warangaon वरणगाव : महामार्गावरील बोहर्डी गावालगत मुक्ताईनगरकडून भुसावळकडे जाणार्‍या बसवरील चालकाने एका अनोळखी इसमास धडक दिल्याने अनोळखी इसम बेशुद्ध झाला तर त्यानंतर महामर्गावरून जाणार्‍या अज्ञात ट्रक चालकाने बेशुद्धावस्थेतील इसमाच्या अंगावरून ट्रक नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

वरणगाव पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा
महामार्गावरील बोहर्डी गावालगत असलेल्या पाटील ढाब्यासमोर शनिवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगरकडून भुसावळकडे जाणार्‍या बस (एम.एच.14 बी.टी. 2698) वरील चालकाने एका अनोळखी इसमास धडक दिल्याने हा इसम बेशुद्ध पडला मात्र, बस चालक बससह निघून गेला मात्र याच दरम्यान मागील बाजुने येणार्‍या अज्ञात ट्रक चालकाने बेशुद्धावस्थेतील इसमाला चिरडुन पोबारा केला. याबाबत पोलिस पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला.