बहन हम शर्मिंदा है; तेरे कातील अब भी जिंदा है

0

शहादा । कठुआ, उन्नाव तसेच सुरत येथील निष्पाप मुलींच्या बलात्कार आणि खुन प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरातील विविध हिंदु-मुस्लिम संघटना व पक्षांच्यावतीने तहसिल कचेरीवर मुकनिषेध मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शहरातील गरीब नवाज कॉलनी, कुकडेल परिसर तसेच काझी चौकातून सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात नगरसेवक प्राचार्य मकरंद पाटील, प्रा.लियाकत अली सैय्यद, कॉ.मुन्ना टेलर, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, नगरसेवक लक्ष्मण बढे, नासिर खॉ पठाण,आरिफ मासू , सैय्यद वाजीद अली, हैदरअली नुरानी, मकसुद खाटीक, वसिम तेली, वाहिद पिंजारी, अ‍ॅड. दानिशखान पठाण, मुजू पहेलवान, साजीद पिंजारी, डॉ. रिझवान मन्सुरी, नबु शेख, समीर जैन, घनश्याम चौधरी, राष्ट्रवादीचे अनिल भामरे, माजी नगरसेवक संजय चौधरी, के.डी.पाटील, एकनाथ नाईक, आनंद सुर्यवंशी, अकील पिंजारी, मुकेश चौधरी, सुनिल गायकवाड, सुनिल शिरसाठ, प्राचार्य महे ुद खाटीक, मुश्ताकअली शाहेद, नई शेख, रफिक मॅकॅनिकल, रमाकांत बच्छाव, मिनहाज मुन्शी, अमानत अन्सारी, सद्दाम मन्सुरी, डॉ.खलील शहा, समीर जकरीया आदिंसह हजारोंचा जनसमुदाय तहसिल कचेरीवर धडकला.

रणरणत्या उन्हात नागरिक उतरले रस्त्यावर
या निवेदनात म्हटल्यानूसार कठुआ येथील आठ वर्षाची चिमुकली आसिफा हिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली आहे. गुन्ह्यातील आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असून ते देवू नये. उन्नाव येथील दलित स्त्रीवर आमदार कुलदिपसिंह सेंगर व त्याच्या भावाने बलात्कार करुन जिवन उध्दवस्त केले. या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. सुरत येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपींनाही फाशीची शिक्षा व्हावी. निर्भया बलात्कार व खुन खटल्यानंतर संपुर्ण भारतात अशा घटना होवू देणार नाही असे पंतप्रधान होण्यापूर्वी सांगितले होते. मात्र आजही देशातील महिला व तरुणींवर बलात्कार होवून हत्या होत आहेत. देशातील महिला तरुणी असुरक्षित झाल्या असून सरकार व पोलिस यंत्रणा याबाबत गंभीर दिसत नाही. या घटनेतील आरोपींवर भारतीय दंड संहितेनूसार कडक शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दुपारी रणरणत्या उन्हात निघालेल्या या निषेध मुकमोर्चात सहभागी हजारोंच्या संख्येने असलेल्या हिंदु – मुस्लीम कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखत निवेदन दिले. यावेळी पोलिस निरीक्षक संजय शुक्ल यांच्यासह शहादा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

निषेध फलकांनी वेधले लक्ष
या मुक मोर्चात मोर्चेकर्‍यांनी कठुआ (जम्मु काश्मिर), उन्नाव (उत्तरप्रदेश) तसेच सुरत (गुजरात) येथील निष्पाप तरुणींवर बलात्कार व खुन प्रकरणी निषेध फलक हातात घेतले होते. या फलकांवर बंद करो हिंदु-मुसलमान; आसिफा के साथ खडा है पुरा हिंदुस्थान, बहेन हम शर्मिंदा है; तेरे कातील अब भी जिंदा है, इंन्सानियत का तकाजा है साहब; बहोत हो गया हिंदू- मुसलमान आदि घोषणा लिहील्या होत्या. मोर्चेकर्‍यांनी तहसिलदार शहादा यांना लेखी निवेदन दिले.

कँडल मार्चव्दारे घटनेचा निषेध
येथील विविध पक्ष, संघटना व धर्मपंथीय युवकांच्यावतीने कठुआ येथील घटनेच्या निषेध करण्यासाठी कँडलमार्च काढण्यात आला. शासकीय विश्रामगृह चौकांत झालेल्या कार्यक्रमात कठुआ येथील चिमुकली आसिफा हिच्यावर बलात्कार करुन हत्या करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. कँडल मार्च काढण्यात येवून सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक सुपडू खेडकर, कौस्तूभ मोरे, सतिष जव्हेरी, दिपक जव्हेरी आदिंसह शेकडो युवक सहभागी झाले होते.