जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत शौक्षणिक वर्ष 2018-19 साठी एम.टेक. प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तांत्रिकीच्या काही जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट, 2018 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत संस्थेत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे, असे संस्थेचे संचालक प्रा.जे.बी.नाईक यांनी कळविले आहे.
सदर रिक्त जागांची संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, अधिक माहितीसाठी या संस्थेतील प्रा.एस.ए.राऊत, समन्वयक (मो.नं. 9860661253) यांचेशी संपर्क साधावा.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेत दि. 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय भूगर्भशास्त्र दिवस साजरा करण्यात आला.
दरवर्षी जिऑलाजीकल सव्र्हे ऑफ इंडियाचे पहिले भारतीय संचालक डॉ.एम.एस.कृष्णन यांचा 24 ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय भूगर्भशास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पर्यावरणशास्त्र प्रशाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस.टी.इंगळे होते. प्रा.एस.एन.पाटील व प्रा.व्ही.एम.रोकडे यांनी संयोजन केले. प्रा.महेंद्र गोडबोले यांनी सुत्रसंचलन व आभार मानले. या कार्यक्रमास प्रशाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.