जळगाव । सागरपार्क या मैदानावर भरारी फाऊंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन व बहिणाबाई पुरस्कार प्रदान सोहळा महसुलमंत्री तथा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, पिपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, आमदार राजूमामा भोळे, आमदार स्मिताताई वाघ, विनायक पारख, महापौर ललित कोल्हे, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांची उपस्थिती होती.
चौथ्या वर्षाला प्रतिसाद
कार्यक्रमाच्य प्रास्तविकात मागील वर्षाच्या महोत्सवात खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसात 88 लाखांची उलाढाल झाली होती. गेल्या चार वर्षापासून सुरू असलेल्या या बहिणाबाई महोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी यांनी सांगितले. त्यामुळे पाहिल्यावर्षी 160 बचत गटाच्या महिलांचा स्टॉल होता, दुसर्यावर्षी 180, तिसर्यावर्षी 200 आणि यावर्षी तब्बल 240 बचत गटाच्या महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
बहिणाबाई पुरस्कारर्थी
सामाजिक क्षेत्रातून ग्रामविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून गावाला पाणी उपलब्ध करून दिले म्हणून चैत्राम पवार, धुळे यांना पुरस्कार देण्यात आला त्याच्या पाठोपाठ समाजात जनजागृती व समाज प्रबोधनाचे उल्लेखनिय कार्य करणार्या चाळीसगाव येथील शाहिर शिवाजी पाटील यांना सांस्कृतीक पुरस्कार, देहविक्री करणार्या पिडीत महिलांना मदतीचा हात देण्यार्या मुंबई येथील गौरी सांवत यांना सामाजिक क्षेत्रासाठी पुरस्कार, स्काय ड्रायव्हिंगसाठी खान्देश कन्या शितल महाजन यांना क्रिडा क्षेत्रातील पुरस्कार, जळगाव जिल्ह्यातील हर्षल विभांडींग यांना शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 100 शाळांना डिजीटल करण्यास उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल पुरस्कार, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस.राणे यांना गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचे अधुनिकीकरणास उभारी दिल्याबद्दल पुरस्कार, महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सतत तत्पर असलेले वासंती दिघे यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, बाल साहित्य कविताच्या माध्यमातून बालकांच्या मनात संस्कृतपणा निर्माण व्हावा साठी मायाताई धुप्पड यांना बाल साहित्य पुरस्कार आणि चोपडा तालुक्यातील मराठे या गावात शाळा नसल्यामुळे आपले शेत विकून शाळा उभारण्याचे उल्लेखनिय कार्य करणार्या गोपाल चव्हाण यांना शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.