बहिणीच्या हळदीला जात असलेल्या भावांच्या दुचाकीचा अपघात

0

जळगाव । एरंडोल येथे बहिणीचा हळदीचा कार्यक्रम काही वेळाने सुरु होण्याच्या धावपळीत जळगावहून भरधाव वेगात कपडे खरेदी करुन जाणार्‍या दोघ भावांचा एकलग्न गावाजवळ आयशरने समोरुन धडक दिल्याने अपघात झाला. तर या धडकेत दोघं भाऊ गंभीर जखमी झाले असून यांच्या मोटारसायकवर असलेला गुजराल पेट्रोल पंपाजवळ लिप्ट मागणार्‍या तरुणाचा मात्र या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. मयत तरूणाची ओळख पटली असून तो उत्तर प्रदेशातील इलाहाबाद जिल्ह्यातील असल्याचा समोर आले आहे.

महामार्गावरील वाढत्या रहदारीचा बळी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाढत्या रहदारीमुळे दररोज सुरु असलेल्या या अपघाताच्या मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने मोठा चिंतेचा विषय बनला आहे. यात एरंडोल येथील जहांगीरपूरा येथील राहणारे दिपक संजय सोनवणे (वय 22), नरेंद्र नाना सोनवणे (वय 19) हे दोघे चुलत भाऊ त्यांच्या बहिणीचे लग्न 20 रोजी असल्याने आज सकाळी कपडे खरेदी करण्यासाठी ते त्यांची दुचाकी क्रमांक एमएच.19. झेड.0325 ने जळगाव येथे आले होते. फुले मार्केट येथून कपडे खरेदी केल्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास बहिणीला हळद लागणार असल्याच्या धावपळीत ते पुन्हा आपल्या घरी एरंडोलकडे निघाले.यावेळी त्यांना गुजराल पेट्रोल पंपाजवळ प्रविणकुमार रामविशाल मिश्रा (वय 18) रा. नागणपूर ता.दसरा जि.ईलाहबाद हा तरूण उभा होता. त्याच्याजवळ भा÷ड्याचे पैसे नसल्यामुळे पेट्रोल पंपाजवळून जात असतांना दिपक, नरेंद्र यांना त्याने थांबवून मला मुसळी फाट्याजवळ जायचे आहे, असे सांगून त्यांना लिप्ट मागितली. यानंतर दोघा भावांना त्याला मोटारसायकवर बसले. यावेळी तिघेही एरंडोलकडे रवाना झाले.

भावडांना गंभीर इजा
एकलग्न गावाजवळील पाळधी पोलिस चेकपोस्ट जवळील पेट्रोल पंपानजीक दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास समोरुन ओव्हरटेक करीत येणार्‍या आयशर गाडीने त्यांना समोरून धडक दिली. यावेळी ते तिघे बाजुला पेैकले गेले. तर यामध्ये प्रविणकुमार मिश्रा हा जागीच ठार झाला. या तिघांना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात अतुल सोनवणे यांनी आणून दोघांवर उपचार केले.

पाळधी पोलिसांनी मयत तरूणाची ओळख पटल्यानंतर त्यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोन्ही भावडांच्या हाता-पायाला गंभीर इजा झाली असून अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय गाठत एकच गदी केली होती.